
हिंदुस्थानच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनी झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने द्वितीय क्रमांक पटकावलवा आहे. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथात शक्तीपीठे व नारीशक्तीच्या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता. या चित्ररथाने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
Breaking: #Maharashtra Tableu based on “Shaktipeeth And Nari Shakti” gets second prize in best tableau category. Uttarakhand gets first prize & Uttar Pradesh ranks third. pic.twitter.com/zkgPzooWBQ
— Dayanand Kamble (@dayakamPR) January 30, 2023
उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ आहे. महाराष्ट्राने नारी शक्ती व साडे तीन शक्तीपिठांचा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दाखविला होता. महाराष्ट्राने यापूर्वी 40 वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. त्यात कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदाची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केलेली. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांनी भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळले.





















































