राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये महाराष्ट्राचा डंका; राज्यातील 74 पोलिसांना पदक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. देशातील 901 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून त्यात महाराष्ट्रातील 74 पोलिसांचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच सहआयुक्त लखमी गौतम, एस. जयकुमार, निशिथ मिश्र यांनाही या मानाच्या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

पोलीस सेवेत उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कामगिरीबरोबरच शौर्य  गाजविणाऱया देशातील पोलिसांना पेंद्रीय गृह खात्याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा केली.  महाराष्ट्रातील 74 पोलिसांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश असून त्यातील गुणवत्तापूर्वक सेवेसाठी 39, उल्लेखनीय सेवेसाठी चार अधिकाऱयांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 31 पोलिसांना शौर्य पदक जाहीर झाले आहे. राज्यातील आयपीएस अधिकाऱयांबरोबर सहाय्यक आयुक्त शैलेंद्र पासलवार, संपोष गायके, पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण, प्रसाद पांढरे आदी अधिकारी, कर्मचाऱयांचा समावेश आहे.

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक

अतिरिक्त पोलीस महासंचालक – देवेन भारती, पोलीस महासंचालक – अनुप कुमार सिंह, उपनिरीक्षक – संभाजी देशमुख, दीपक जाधव.

गुणवत्तापूर्व सेवेसाठी पोलीस पदक

पोलीस महानिरीक्षक – जयकुमार सुसाईराज, लखमी गौतम, निशिथ मिश्रा, उपअधीक्षक-संतोष गायके, सहाय्यक आयुक्त – चंद्रकांत मेकर, शैलेश पासलवार, पोलीस निरीक्षक – दीपक चव्हाण, तसेच रमेश कथार, देवीदास घेवरे, सुधाकर काटे, मनोज नेर्लेकर, शाम शिंदे, अलका देशमुख, दत्तात्रय पाबले, बापू ओवे, प्रसाद पांढरे, शिरीष पवार, सदाशिव पाटील, सुरेश घाटेकर, दिलीप सावंत, संतोष कोयंडे, चंद्रकांत लंबाट, झाकिरहुसेन किल्लेदार, भारत पाटील, प्रमोद किटे, आनंद घेवडे, सुखदेव मुरकुटे, गोकुळ वाघ, धनंजय बारभाई, सुनील गोपाळ, दत्तात्रय काडनोर, ज्ञानेश्वर आवारी, रामकृष्णा पवार, ओमप्रकाश कोकाटे, सुभाष गोईलकर, संजय कुपेकर, प्रदीप आहिरे, प्रकाश घाडगे, विजय पवार.

पोलीस शौर्य पदक

मनीश कालवानिया, संदीप मंडलिक, राहुल नमाडे, सुनिल बागल, देवेंद्र आत्राम, गणेश दोहे, एकनाथ सिदाम, प्रकाश नरोटे, दिनेश गावडे, शंकर पुंगाटी, योगीराज जाधव, अमोल फडतरे, सदाशिव देशमुख, प्रेमकुमार दांडेकर, राहुल आव्हाड, देवाजी कोवासे, राजेंद्र मडवी, नांगसू उसेंडी, देवेंद्र आत्राम, प्रदीप भास्करकार, सुधाकर कोवाची, नन्देश्वर मडवी, सुभाष पाडा, भाऊजी मडवी, शिवाजी उसेन्डी, गंगाधर कराड, रामा कोवाची, महेश मदेशी, स्वप्नील पाडा, तानाजी सावंत, नामदेव यादव.