महाविकास आघाडी, शिवसेनेने केलेल्या कामांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवार, 19 जानेवारी रोजी मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ‘बीकेसी’ येथे भव्य सभाही होणार आहे. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्यासाठी आगामी महापालिका निवडणुका डोळय़ासमोर ठेवून पंतप्रधानांच्या दौऱयाचा घाट घातल्याचा हल्लाबोल ‘महाविकास आघाडी’कडून ‘मिंधे’ गट आणि भाजपवर करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या नावाखाली ‘मिंधे’ सरकारकडून अनेक विकासकामांच्या भूमिपूजन-लोकार्पणाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या अखत्यारीत होणारी बहुतांशी कामे पालिकेत शिवसेनेच्या काळातच मार्गी लागली होती. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रुग्णालयांचा पुनर्विकास, सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, मेट्रो मार्ग आदी बहुतांशी कामे शिवसेना-महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम टप्प्यात आली होती. मात्र ही कामे सुरू होण्याच्या मार्गावर असताना या कामांचे श्रेय लाटण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन-लोकार्पण करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

आरोग्य केंद्रांचे दुसऱ्यांदा लोकार्पण
– मुंबईकरांना घराजवळच वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शिवसेनेच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्र’ उपक्रम सुरू करण्यात आला.
– गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी 200 कोटींची तरतूदही करण्यात आली, मात्र ही ‘आरोग्य पेंद्रे’ आपणच केल्याचा आव ‘मिंधे’ सरकारकडून आणला जात आहे. सद्यस्थितीत सुमारे 60 हून अधिक आरोग्य पेंद्रे सुरूही झाली आहेत.
– विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 17 नोव्हेंबर रोजी या उपक्रमाचे धारावीत रीतसर लोकार्पण होण्याआधीच हे दवाखाने सुरू झाले होते. तर आता पुन्हा एकदा याच उपक्रमातील 20 दवाखान्यांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे होणार उद्घाटन

ऐतिहासिक रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास 1853 कोटी रूपये खर्चून करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन उद्या गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत तब्बल 36 हेक्टर क्षेत्राचा कायापालट होणार असून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानुसार पुनर्विकसित स्थानकात खाद्यपदार्थंची दुकाने, हॉटेल, मनोरंजनाची साधणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच स्थानकात ऊर्जा बचत यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.

या कामांचे भूमिपूजन
मुंबईभरात 7 मलजल प्रक्रिया केंद्रे – खर्च 17 हजार 182 कोटी z एकूण 397 किमी रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरण – खर्च 6079 कोटी z पीएम स्वनिधी योजना – एक लाख फेरीवाल्यांना दहा हजारांचे कर्जवाटप z भांडुप मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालय – 670 कोटी, सिद्धार्थ गोरेगाव रुग्णालय – 405 कोटी आणि ओशिवरा प्रसूतिगृह – 125 zतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 20 आरोग्य पेंद्रे आणि मेट्रो मार्ग – 2 ए, मेट्रो मार्ग – 7 यांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सभा व्यवस्थापनाचा खर्च पालिकेच्या माथी
पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी येणाऱया गर्दीची व्यवस्था करण्याचे निर्देश ‘मिंधे’ सरकारकडून पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये बैठक व्यवस्था, पाणी, फिरती शौचालये, स्वच्छता आणि महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या कामांची ऑडिओ, व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमांमध्ये, सोशल मीडियात जाहिरात करण्याची जबाबदारीही पालिकेवर सोपवण्यात आली आहे. पालिकेवर हा खर्चाचा बोजा का, असा सवाल विचारला जात आहे.