राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातल्या ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱया तब्बल 257 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा या महिन्याच्या अखेरीस उडणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. काही ठिकाणी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱयांनी शिंदे व भाजपशी स्थानिक पातळीवर युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, पण शिंदे किंवा भाजपशी युती करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठाRनी घेतला आहे.

निवडणुकांमध्ये धनशक्तीचा वापर
या निवडणुकांमध्ये साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होतो. त्यामुळे या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाने प्रत्येक जिल्हा पातळीवर अप्पर जिल्हाधिकाऱयांची निवडणूक निरीक्षक म्हणून, तर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांची सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

30 एप्रिलपूर्वी निवडणुका होणार
राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकांसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका होत आहेत. राज्यातील 281 पैकी पात्र ठरलेल्या 257 बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. 30 एप्रिलपूर्वी या निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुणे जिह्यातील शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. उर्वरित मोठय़ा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, जळगावचा समावेश आहे.

महाविकास आघाडी मजबूत
या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय तीनही पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे, पण तरीही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये स्थानिक पातळीवर काही ठिकाणी शिंदे गट व भाजपशी युती केल्याच्या तक्रारी काँग्रेसकडे आल्या आहेत, पण या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेतला तर कारवाई
होणार आहे.

महाविकास आघाडी अबाधित
यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्थानिक पातळीवर भाजप-शिंदे गटाशी युती हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केलेले खपवून घेतले जाणार नाही हे लक्षात ठेवावे असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी अबाधित राहील याकडे लक्ष द्यावे असे काँग्रेसने बजावले आहे.