
सामना ऑनलाईन । मुंबई
पॉर्नस्टार सनी लिओनी हिला क्रिकेटची तशी फार आवड नाही मात्र टीम इंडियातला एक खेळाडू मात्र तिला फार आवडतो. हिंदुस्थानचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी हा तिचा आवडता खेळाडू असल्याचे तिने सांगितले आहे. मात्र सनीला त्याच्या खेळापेक्षा तो ज्याप्रकारे कुटुंबाला प्राधान्य देतो ते फार आवडते.

11Wickets.com या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्यावेळी सनीने तिला धोनी आवडत असल्याचे सांगितले आहे. ‘धोनी मला फार आवडतो. तो त्याच्या मुलीसोबतचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. ते फार सुंदर असतात. तो एक कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. त्यामुळे तो माझा आवडता क्रिकेटपटू आहे’असे सनीने सांगितले.































































