
गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या एका अभिनेत्रीच्या वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली आहे. ही अभिनेत्री तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्ध झाली होती.
या अभिनेत्रीचं नाव महिमा चौधरी असं आहे. 24 वर्षांपूर्वी आलेल्या परदेस या चित्रपटातून ती झळकली होती. त्या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर मात्र ती फारशी चमक दाखवू शकली नाही.
नुकतीच तिने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील काही गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. तिने अभिनेत्रींकडे बघण्याच्या दृष्टिकोनातला बदल या मुलाखतीतून सांगितला आहे. तसंच या रुपेरी पडद्यामागच्या काही काळ्या सत्यांबाबतही बोलून दाखवलं आहे.
ती म्हणाली की, आज अभिनेत्रींना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वीकारलं जातं. माझ्यावेळी ही परिस्थिती नव्हती. तेव्हा अभिनेत्रींची वैयक्तिक आयुष्यं ही त्यांना व्यावसायिक आयुष्यापासून दूर ठेवावी लागत असे. किंबहुना करिअरसाठी वैयक्तिक आयुष्याचे अनेक निर्णय लांबणीवर टाकावे लागत.
तिच्या म्हणण्यानुसार, जर एखादी अभिनेत्री कुणाला डेट करत असल्याची माहिती मिळाली तर तिची चित्रपटातून हकालपट्टी केली जात असे. कारण निर्मात्यांना चित्रपटासाठी फक्त व्हर्जिन मुली हव्या असत, अशा मुलींना प्राधान्य दिलं जायचं ज्या मुलींनी कधी कुणाला किस सुद्धा केलेलं नसेल, असा दावा महिमाने केला आहे.
आता मात्र ही परिस्थिती राहिलेली नाही. आता अभिनेत्री दोन्ही गोष्टी सोबत सांभाळतात, असं म्हणून महिमाने समाधान व्यक्त केलं आहे.




























































