
चंदीगडमधील पीजीआयएमईआर प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा 100 वा भाग न ऐकल्याप्रकरणी 36 नर्सिंग विद्यार्थिनींना शिक्षा केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी भीती व्यक्त केली की, ‘पंतप्रधानांचे रेडिओवरील भाषण न ऐकल्यामुळे त्यांना शिक्षा होईल का आणि तिला घर सोडू नका असं सांगितलं जाईल का?’. मात्र महत्त्वाची बाब अशी आहे की हे ट्विट करताना, मोइत्रा यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ रेडिओ प्रसारणाचा उल्लेख ‘Monkey baat’ (माकडाची बात) असा केला आहे.
‘मी ‘Monkey baat’ ही एकदाही ऐकलेली नाही. कधीच नाही. मलाही शिक्षा होणार आहे का? मला आठवडाभर घराबाहेर पडण्यास मनाई केली जाईल का? मला आता काळजी वाटते’, असं मोइत्रा असं ट्विट केलं आहे.

36 नर्सिंग विद्यार्थिनींना वसतिगृह सोडण्यापासून का रोखण्यात आले?
PGIMER अधिकार्यांनी लेखी आदेश जारी केला होता की,’ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (NINE) मधील सर्व नर्सिंग विद्यार्थिनींनी 30 एप्रिल रोजीच्या मन की बात कॅम्पसमधील कार्यक्रमात भाग घ्यावा’.
गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात, पीजीआयएमईआरने नर्सिंग विद्यार्थिनींना पंतप्रधान मोदींचे रेडिओ प्रसारण ऐकण्याच्या निर्णयाचा बचाव केला. संस्थेने सांगितलं की, हा नियमित अभ्यासक्रमातील कृतीचा एक भाग म्हणून धरण्यात आले आहे. जिथे तज्ज्ञ आणि व्यावसायिकांना विशेष व्याख्यान आणि चर्चांसाठी आमंत्रित केलं जातं. ही सूचना त्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून वर नमूद केलेल्या भागामध्ये उपस्थित राहता यावी या हेतूने देण्यात आली होती ज्यात त्यांना मूल्यशिक्षण देण्यासाठी सर्वोत्तम वक्ते, तज्ज्ञ, व्यावसायिक यांच्याद्वारे नियमितपणे चर्चा, पाहुण्यांची व्याख्याने आणि चर्चा आयोजित केल्या जातात’, असं त्यांनी म्हटले आहे.
तर, 28 तृतीय वर्षाच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी आणि आठ प्रथम वर्षाच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी पंतप्रधानांचे रेडिओ भाषण ऐकले नाही. त्यांनी सत्राला उपस्थित न राहण्याचे कोणतेही कारण न दिल्याने पीजीआयएमईआर अधिकाऱ्यांनी त्यांना, ‘आठवडाभर वसतिगृह सोडू नका’, असं सांगितलं.
पीजीआयएमईआरनं म्हटलं आहे की, ‘याला कोणताही अन्य अर्थ दिला जाऊ नये’.


























































