अर्जुन कपूरने शेअर केला जिममधला फोटो, मलायकाने केली ‘ही’ कमेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा मलायकासोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे जास्त प्रसिद्ध झाला आहे. आपल्या नात्याविषयी अद्याप त्या दोघांनी अधिकृत खुलासा केलेला नसला तरी त्यांच्या सोशल मीडियावरच्या कमेंट्समधून मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं. नुकत्याच शेअर झालेल्या अर्जुनच्या जिममधल्या लूकवरून मलायका अर्जुनच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

त्याचं झालं असं की, अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी पानिपत या चित्रपटासाठी जोरदार तयारी करत आहे. एका योद्ध्याच्या भूमिकेसाठी तो जिममध्ये घाम गाळून पिळदार शरीर घडवतोय. त्याच्या या जिममधल्या एका लूकचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला. त्यात त्याची पिळदार शरीरयष्टी दिसतेय. त्याखाली त्याने वॉरियर मोड ऑन अशी कॅप्शनही दिली आहे. या फोटोखाली त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. पण, त्यातही एक कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अर्जुनच्या या फोटोवर त्याची तथाकथित प्रेयसी मलायका अरोरा हिने कमेंटमध्ये पिळदार हाताचा इमोजी पोस्ट केला आहे. या कमेंटमुळे पुन्हा एकदा अर्जुन आणि मलायकाच्या प्रकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत.


View this post on Instagram

Warrior mode on !!! #panipat

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुनचा नुकताच प्रदर्शित झालेला इंडियाज मोस्ट वाँटेड तिकीटबारीवर आपटला आहे. सध्या तो आशुतोष गोवारीकरांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट असलेल्या पानिपतच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त आणि कृती सेननही झळकणार आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.