मालवणीत स्पीकरच्या वादातून पुरुषाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पीकरच्या वादातून पुरुषाची हत्या झाल्याची घटना मालाडच्या मालवणी येथे घडली. सुरेंद्र गौड असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी सैदअली चांदोली ऊर्फ सैफूला अटक केली. सुरेंद्र हा मालवणीच्या एकता सेवा मंडळ येथील चाळीत पत्नी आणि मुलासोबत राहत होता. त्याच्या शेजारी सैफू हा राहतो. बुधवारी सुरेंद्र हा घरी टेपवर गाणी ऐकत होता. टेपचा आवाज वाढवण्यावरून सैद आणि सुरेंद्रचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात सैफने सुरेंद्रला जमिनीवर आपटले. त्यात सुरेंद्र हा जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच मालवणी पोलीस घटनास्थळी पोहचले. सुरेंद्रच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी सैफविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.