हिरोसोबत सेक्सला नकार दिल्यानं मला चित्रपटातून काढून टाकलं!

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवरून वातावरण तापलेले असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचचा खळबळजनक खुलासा केला आहे. ही अभिनेत्री काम करत असलेल्या चित्रपटातील हिरोने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, मात्र तिने नकार दिल्यानंतर तिला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे या अभिनेत्रीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

‘मर्डर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मल्लिका शेरावतने तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच झाल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटात मल्लिकाने बरीचसी प्रणयदृश्ये दिली होती. ‘मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. जर तुम्ही तोकडे कपडे घालता, स्क्रिनवर किसिंग सीन देता म्हणजे तुम्हाला नितीमत्ता सोडलेली महिला म्हणून बघितले जाते. पुरुष आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवायला लागतात. माझ्यासोबतही असे झाले आहे. मी एका हिरोला सेक्ससाठी नकार दिला म्हणून मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. त्या हिरोने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. जर तू स्क्रीनवर माझ्यासोबत प्रणयदृश्य करू शकतेस तर मग खासगी आयुष्यातही करू शकते अशी मागणी तो करत असल्याचे, तिने सांगितले. पण त्याला मी नकार दिल्यानंतर मला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. हे असेच आपल्या समाजात घडते. आपल्या देशातील महिलांना अशाच गोष्टींना सामोरे जावे लागते, असे मल्लिकाने वृत्तसंस्थेला सांगितले.

बॉलिवूडमधल्या अशा गोष्टींचा आपण विरोध केल्याचे देखील मल्लिकाने सांगितले आहे. ‘मी एक स्वाभिमानी महिला आहे. कुठल्याही परिस्थितीशी मी तडजोड करत नाही. अनेकदा मला चित्रपटाच्याा निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी रात्री भेटायला बोलावले पण मी गेले नाही. जर मी बॉलिवूडमधल्या या प्रवाहासोबत चालले असते तर मी आज बॉलिवूडमध्ये वेगळ्या ठिकाणी असते’, असे देखील मल्लिकाने सांगितले.