आपलं गाव अन् कौलारू घराची सर कशालाच नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता प्रथमेश परब आगामी काळात ‘टकाटक 2’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच गोव्यातील पहिले शेडय़ूल संपवून तो मालवणमधील आपल्या गावी सुट्टी एन्जॉय करतोय. गावी घालवलेल्या निवांत क्षणांचे फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या पह्टोत प्रथमेश निसर्गाच्या सान्निध्यात झाडाच्या सावलीखाली खुर्चीवर निवांत बसून शहाळ्याचा आस्वाद घेताना दिसतोय. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलंय, ‘गोवा, शूट, पॅकअप कट टू… मालवण. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, कितीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं, चमचमीत पदार्थ खाल्ले तरीही आपलं गाव, तिथलं काैलारू घर, तिथली माती अन् माणसं याची सर कशालाच येऊ शकत नाही.’ सोबतच कोकण, निसर्ग, शांतता आणि मी असे हॅशटॅग त्याने वापरले आहेत. त्याचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.