
अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला करणाऱया योगेशकुमार सिंगला अखेर वर्सेवा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हिमाचलची रहिवासी असलेली मालवी ही अंधेरी परिसरात राहते. गेल्या वर्षी मालवीची योगेशकुमार सोबत ओळख झाली होती. त्याने मालवीला लग्नासाठी मागणी घातली होती.
मालवीने योगेशकुमारला नकार दिला होता. 26 ऑक्टोबरला मालवी ही सातबंगला येथून जात होती. तेव्हा योगेशकुमारने पुन्हा प्रपोझ केला. योगेशकुमारने मालवीला धमकी देऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला. चाकूहल्ल्यात मालवी जखमी झाली.
हल्ला प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान योगेशकुमारला वर्सेवा येथून पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.




























































