पंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जीं नंबर 1 च्या दावेदार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिध । नवी दिल्ली

‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच पंतप्रधान पदासाठी प्रथम क्रमांकाच्या नेत्या आहेत.’ हा एखाद्या सर्वेक्षणातून आलेला निष्कर्ष नाही. तर खुद्द भाजपच्याच एका नेत्याने हे वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमधचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी याच पंतप्रधान पदाच्या पहिल्या दावेदार असल्याचे म्हटले आहेत.

शनिवारी 5 जानेवारी रोजी ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना दिलीप घोष यांनी “ममता दिदींना जास्त तंदुरुस्त राहण्याची आवश्यकता आहे. कारण या घडीला जर कोणी बंगाली पंतप्रधान होणार असेल तर ममता बॅनर्जीच पंतप्रधान होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. मी त्यांना चांगले आरोग्य आणि यश लाभो अशी प्रर्थना करतो. त्यांच्या यशावरच राज्याची प्रगती अवलंबून आहे “अशा शुभेच्छा घोष यांनी दिल्या.