लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. सुरेश जैन असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तक्रारदार या सोमवारी नातेवाईकांसोबत बोरिवली रेल्वे स्थानकात आल्या होत्या. त्या चर्चगेट जलद लोकलने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांना नको तिथे स्पर्श केला. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा काही वेळाने महिलेला अश्लील स्पर्श करण्यात आला. महिलेने हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिला असता अंधेरी स्थानकात लोकल आल्यावर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.