तोतया सीबीआय अधिकारी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाकडे पैशाची मागणी केल्याप्रकरणी परवेज खान, अभिजित नागवेकर आणि ब्रिजेश सरोज या तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार याचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे ब्रिजेश कामाला आहे. चार वर्षांपूर्वी व्यावसायिकाची एकाशी ओळख झाली होती. त्याच्याकडून व्यावसायिक हे मोबाईल विकत घेत असायचे. फेब्रुवारीत व्यावसायिकाने एकाकडून 331 आयपह्न विकत घेतले होते. मार्चमध्ये एकजण व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये आला. आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत संबंधित व्यक्तीचे पैसे देऊन टाकावे असे त्यांना सांगितले. त्यानंतर एप्रिल महिन्यात दोघांनी ब्रिजेशला सीबीआय कार्यालयात चल असे सांगून त्याला घेऊन गेले.

ब्रिजेशने व्यावसायिकांना पह्न करून आपल्याला वाचवावे असे सांगितले. पहाटे त्या दोघांनी ब्रिजेशला सोडले. या घटनेनंतर व्यावसायिकांना पैशासाठी वारंवार धमकावले. तीन दिवसांपूर्वी एकाने व्यावसायिकाला पह्न करून धमकावले. दोघांनी व्यावसायिकांना पह्न करून सीबीआयची टीम बिल्डिंगखाली बसली असून ते आता ब्रिजेशला अटक करणार असे सांगितले. त्यामुळे व्यावसायिक घाबरले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने व्यावसायिकाने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.