पिस्तूलाच्या धाकाने दमबाजी करणाऱ्याला अटक, लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्याकडे लायसन्सचे पिस्तूल आहे, तुला बघून घेतो असे म्हणत धमकी देउन शिवीगाळ करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे. रामेश्वर यशवंत हरगुडे (वय 30 रा. केसनंद वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. म्हस्कू केरबा मोडक (रा. वडकी, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्कू मोडक, पप्पू आंबेकर आणि सुदाम आंबेकर यांच्यात 31 मार्चला जुन्या फ्लॅटच्या व्यवहारावरून बोलणे सुरू होते. त्यावेळी आरोपी रामेश्वर त्याठिकाणी गेला. त्याने म्हस्कूला मारहाण करून कंबरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले. माझ्याकडे पिस्तूल आहे, तुला बघून घेतो, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली होती.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्के आणि काटे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, नीलेश राणे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली.