
सामना प्रतिनिधी । नांदेड
हिमायतनगर शहरातील शे.सद्दाम हुसेन (25) या युवकाने अंगावर रॉकेल ओतून पोलीस ठाण्यात आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर युवक हा 90 टक्के भाजला असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, शेखचे घरात कोणत्यातरी कारणावरून वाद झाले होते. त्यानंतर तो रागाच्या भरात पोलीस ठाण्यात आला व तेथे त्याने स्वत:ला पेटवून घेतले. कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी एस.एस.पवार, जाधव तत्काळ त्याची आग विझवित त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचार करुन हुसेनला नांदेडला हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र बोरसे हे करीत आहेत.



























































