
हिंदुस्थानी हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये संघाचा पदकाचा दुष्काळ संपविण्याच्या निर्धाराने आम्ही मैदानात उतरू, असा विश्वास हिंदुस्थानी हॉकी संघाचा फॉर्वर्डस् मनदीप सिंग याने व्य्कत केला आहे. हे ऑलिम्पिक वर्ष असून आम्ही हिंदुस्थानी हॉकीपटू जिद्दीने आणि परिश्रमाने टोकियोत अंतिम फेरी गाठण्यासाठी निकराचा लढा देऊ असे मनोगत 2019 चा ‘धनराज पिल्ले फॉर्वर्डस्’ हा पुरस्कार स्वीकारल्यावर मनदीप याने व्यक्त केले.

























































