मुंबईतील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 च्या 36 जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्यक्त केला. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार मंगलप्रभात लोढा यांनी स्वीकारला तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नुकतीच नियुक्ती जाहीर झाली. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार बुधवारी स्वीकारला. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह मंत्री, आमदार तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.

बांगलादेशी घुसखोरांना मुंबईत मतदान करू देणार नाही – मंगलप्रभात लोढा
विधानसभेच्या मुंबईतील सर्वच्या सर्व 36 जागा जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे. त्यासाठी दिवस कमी उरले आहेत. पण कार्यकर्त्यांच्या ताकदीवर हे लक्ष्य आपण पूर्ण करून दाखवू असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. मुंबईतील बांगलादेशी नागरिकांना मुंबईच्या मतदारयादीत कोणत्याही प्रकारचे स्थान मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.