
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा आरक्षणासंदर्भातील कृती अहवाल (एटीआर) आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जाईल. त्यानंतर विधेयक मांडले जाईल. पण विधेयकासाठी वेळ कमी पडला, तर अधिवेशनाचा वेळ देखील वाढवण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
LIVE- मराठा आरक्षणासंदर्भातील विधानसभेतील चर्चेचे व्हिडीओ आणि अपडेट
विरोधीपक्षांनी विधानसभेत सरकारच्या भूमिकेवर आधी टीका केली आणि विधेयक मांडण्यासाठी आता वेळ कमी उरला आहे, असा इशारा दिला होता. आज अधिवेशनाचा शेवटून दुसरा दिवस आहे, असे अजित पवार वारंवार म्हणत होते. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठा संघटनांकडून स्वागत
मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाचा काळ वाढवण्याची घोषणा सरकारकडून होताच मराठा संघटनांनी त्याचे स्वागत केले. या सरकारकडून अशीच चांगली अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
summary: maratha reservation ATR in maharashtra vidhan sabha




























































