Live मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

  • आजचा दिवस ऐतिहासिक कारण एकमताने मताने मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्या ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया
  • मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर

  • मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षांकडून अभिनंदन
  • विधेयकाला विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला
  • मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडले
  • मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

  • मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले
  • विधेयकाला सर्वपक्षांनी दिला पाठिंबा
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक मांडले
  • युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील विधानभवनात पोहोचले
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला
  • शिवसेना-भाजपचे आमदार फेटे घालून विधीमंडळाच्या आवारात
  • फक्त अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद नाही 
  • अनुदानीत-विनाअनुदानीत संस्थांमध्ये आरक्षणाची तरदूत
  • शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद 
  • मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाची तरतूद असल्याची माहिती
  • ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही
  • विधेयकातील तरतूदी 
  • विधेयक मंजुर केलं तरी न्यायालयात जाणार आहेच, दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्याने गोंधळ
  • छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी सभागृह दणाणले
  • विधानसभेत प्रचंड घोषणाबाजी
  • मुख्यमंत्र्यांनी एटीआर मांडला, अभ्यासासाठी विरोधकांनी वेळ मागितला
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी एटीआर सादर केला
  • हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना
  • मराठा समाजाकडून सरकारच्या भूमिकेचं स्वागत
  • याच अधिवेशनात मराठा विधेयक मांडले जाईल, जर गरज पडली तर अधिवेशनाचा काळ वाढवला जाईल
  • मराठा आरक्षणाचा एटीआर मांडणार- चंद्रकांत पाटील
  • महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सरकारकडून बोलण्यास उभे राहिले
  • तरी देखील विरोधकांचा विधेयकाला पाठिंबा असेल
  • व्हॉट्सअॅपवर मेसेज फिरवले जात आहेत जल्लोश करा, पण कशाचा जल्लोश करायचा? राज्य अंधारात असताना जल्लोष कसा करायचा?
  • समित्यांच्या बैठका सुरू आहे, अभ्यास जोरात सुरू आहे, पण विरोधी पक्षांना पूर्ण अंधारात ठेवलं
  • विरोधीपक्षांना अंधारात ठेवून विधेयक मांडले जाणार आहे
  • आज अधिवेशनाचा शेवटून दुसरा दिवस आहे- अजित पवार
  • सरकार आज विधेयक आणणार की नाही? याचे उत्तर द्या- विखे पाटील
  • राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षाची भूमिका मांडली
  • मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक संपली
  • मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीला सुरुवात
  • राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार यांनी केली जोरदार घोषणाबाजी
  • मराठा-धनगर-मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे, विरोधकांनी मागणी लावून धरली
  • विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी
  • मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल
  • भाजप मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक आज बोलवण्यात आली
  • दुपारी 12 वाजता एटीआर मांडणार तर दुपारी 1 वाजता विधेयक मांडले जाणार
  • राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक थोड्याच वेळात
  • आज मराठा आरक्षणासंदर्भातील राज्या मागासवर्गाने दिलेल्या अहवालाचा कृती अहवाल (एटीआर) विधानसभेत मांडणार

Summary- Maratha reservation ATR and Bill in Maharashtra Vidhan Sabha