मराठा ठोक मोर्चा समर्थनार्थ वडवणीत रास्तारोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी

मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात परळी येथे काढण्यात आलेल्या ठोक मोर्चाच्या समर्थनार्थ वडवणी येथे बीड परळी हायवेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम करत दुपारी रास्तारोको आंदोलन केले.

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे यासह इतर मागण्यासाठी मराठा समाज बांधवांकडून मुकमोर्चे काढण्यात आले होते. शासनाने त्याची आजपर्यंत दाखल न घेतल्याने तुळजापुर येथून सुरू झालेल्या ठोक मोर्चा काल बुधवार रोजी परळी येथील तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकरांनी ठोस आश्वासन द्या नाहीतर माघार नाही ही भूमीका घेतल्याने त्यांना पाठींबा म्हणून वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रचंड जनसमुदायात रास्तारोको करण्यात आला यावेळी लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. रास्तारोको आंदोलना दरम्यान कोठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडवणी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.