
गाडी रिव्हर्स घेण्याच्या वादातून मराठी अभिनेत्रीशी हुज्जत घालणाऱयाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
तक्रारदार या अभिनेत्री असून त्या शुक्रवारी गोरेगाव परिसरातील एका रुग्णालयामध्ये गेल्या होत्या. रुग्णालयामधून कारने घरी जात असताना एका अरुंद रस्त्यावर समोरून अटक व्यक्तीची गाडी येत होती. गाडी रिव्हर्स घेण्यावरून शाब्दिक वाद झाला. घडल्याप्रकरणी महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला अटक केली व न्यायालयात हजर केले.
























































