अक्षय कुमारच्या ‘चुंबक’चा ट्रेलर आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chumbak movie poster

सामना ऑनलाईन । मुंबई

अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा ट्रेलर अक्षयच्याच हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला. आयुष्यात कशाची निवड करायची याबद्दल या चित्रपटात भाष्य केले असल्याचे ट्रेलर लॉन्चवेळी अक्षयने सांगितले. ‘आधी तुम्ही निवड घडवता आणि नंतर त्या निवडी तुम्हाला घडवतात,’ असेही तो पुढे म्हणाला. हा चित्रपट २७ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. जुहू येथील पीव्हीआर सिनेमा येथे झालेल्या या कार्यक्रमाला गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे, प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी, लेखक सौरभ भावे आदी उपस्थित होते.