जिनिलियाला मराठी मालिकेचे वेड !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचे कथानक अतिशय उत्पंठावर्धक वळणावर आहे. दीपाविषयी कार्तिकच्या मनात असणारा गैरसमज दूर करण्यासाठी आणि निरपेक्ष प्रेमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिनिलिया देशमुखची खास एन्ट्री होणार आहे.

रितेश आणि जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. निरपेक्ष प्रेमाचे महत्त्व पटवून देणाऱया या सिनेमाची कमालीची उत्सुकता आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिनिलियाने या मालिकेत हजेरी लावली. जिनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्याची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आलाय. जाहीर माफी मागत कार्तिक सन्मानाने दीपाला पुन्हा घरी आणणार आहे.