
अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्सचे संस्थापक मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांना रिटेल उद्योगातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल इंडिया टुडे समूहातर्फे प्रतिष्ठsचा ‘आयकॉन ऑफ दुबई’ हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दुबईमध्ये पाम जुमैरा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात राजकीय नेते डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते डॉ. दातार यांना हा पुरस्कार देण्यात आला.
अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्सचा 50हून अधिक रिटेल सुपर मार्केट, पिठाच्या गिरण्या व मसाला कारखाने असा विस्तार आहे. आखाती देशात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या हिंदुस्थानींच्या वैविध्यपूर्ण चवींची पूर्तता करणारी उच्च दर्जाची खाद्य उत्पादने रास्त किंमतीत पुरवतो. आनंद व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, हा पुरस्कार मी नम्रतेने स्वीकारत आहे. दर्जेदार उत्पादने देऊन व हिंदुस्थानचा अस्सल स्वाद राखून आपल्या समुदायाची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला मिळालेला हा पुरस्कार एकप्रकारे संपूर्ण अदील परिवाराचे परिश्रम व समर्पितता याचा पुरावा आहे.

























































