माऊली चॅरिटेबल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्टची डॉक्टर दिंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माऊली चॅरिटेबल अॅण्ड मेडिकल ट्रस्टच्या वतीने आषाढी वारीनिमित्त डॉक्टर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या संस्थेचे 34 वे वर्ष आहे. 8 ते 25 जुलै या कालावधीत आळंदी ते पंढरपूरपर्यंत पार पडणाऱया पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱयांच्या सेवेसाठी या डॉक्टर दिंडी म्हणजेच मोफत फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली आहे.

दरवर्षी दिंडीत सहभागी झालेले वारकरी छोटय़ा आजारांनी त्रस्त होतात. अशा वारकऱयांच्या सेवेसाठी या डॉक्टर दिंडीचे आयोजन करण्यात येते. या दिंडीला सारस्वत बँक, ड्रग इंस्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा), फूड ऑफिसर्स असोसिएशनसह अनेक संस्था, मठ व सेवा मंडळांचे विशेष सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी औषधे व आर्थिक पाठबळ द्यावे. तसेच धनादेश ‘माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट’च्या नावाने द्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः संस्थेचे संस्थापक -विश्वस्त डॉ. दीपक मोहिते 8080024200, प्रकाश बोरकर 9757376350, बाळासाहेब हाबडे 9324514646.