ऑलिम्पिक आयोजनाला वैद्यकीय तज्ञांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी चार महिन्यांहून कमी कालावधी उरलाय. जपानमध्ये मशाल रिलेदेखील सुरू झालेली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेथील काही वैद्यकीय तज्ञांचा अजूनही या क्रीडा महाकुभाला विरोध असल्याचे दिसून येत आहे.

ऑलिम्पिकच्या आयोजनसाठी 50 ते 70 टक्के नागरिकांना कोरोनाची लस देण्याची गरज आहे, मात्र जपानमधील लसीकरणाची गती अतिशय मंद आहे. आतापर्यंत एक टक्क्याहून कमी नागरिकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेले नाही. आपण टोकियो ऑलिम्पिक आणखी पुढे ढकलायला हवे, असे स्पष्ट मत योकोहामा येथील कीयू रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञ डॉ. नोरियो सुगाया यांनी व्यक्त केले.

टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी हजारो परदेशी नागरिक जपानमध्ये येतील. त्यामुळे कोरोनाकाळात या सर्वांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी जपानवर असणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने डॉ. तोशियो नकागावा यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले.