आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

41

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर विविध कामांनिमित्त रविवार 21 जुलै रोजी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बरवरील लोकल रद्द केल्या आहेत. तर अन्य मार्गावरील लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे वर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल सेवा दिवा ते परळ धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. परळनंतर पुन्हा जलद मार्गावर लोकल धावेल. सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावेल. तर त्यानंतर दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी पॅसेंजर गाडी सुटेल. यासाठी दादर स्थानकातून दुपारी 3.40 वाजता विशेष लोकलही सोडण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदरदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. विरार, वसई रोड ते बोरीवली, गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर धावतील. तर गोरेगाव ते वसई रोड, विरार दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर धावतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांवर अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत तसेच डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या अप व डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या