उदगीरच्या व्यापाऱ्यास लुटले: दिड लाखाची चेन आणि ५ हजाराची रोकड काढून घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । लातूर

उदगीर येथील व्यापाऱ्यास निटूर उजेड मार्गावरील गुलजार धाब्यावर पाचजणांनी मिळून लुटल्याची घटना घडली आहे. त्याला चोरट्यांनी मारहाण करुन दिड लाख रुपयांची सोन्याची चेन व पाच हजार रुपयांची रोकड काढून घेतली. जातांना त्याच्या कारची तोडफोड करुन २५ हजारांचे नुकसान केले. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर येथील रहिवाशी असणारे अविनाश रमेश कोरे हे कामानिमीत्त निलंगा येथे आपली कार घेऊन गेले होते. १८ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते निलंगा येथून परत असतांना निटूर ते उजेड मार्गावरील गुलजार धाब्यावर जेवणासाठी थांबले. त्याचवेळी एक कार आणि मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी त्यांची कुरापत काढून बाचाबाची व शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करुन त्यांच्या गळयातील दिड लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, खिशातील पॉकीटमधील रोख ५ हजार रुपये, आधार कार्ड, एटीएम कार्ड पळविले.