
स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (पूर्व द्रुतगती मार्ग) या मेट्रो 6 मार्गिकेसाठी प्रस्तावित कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामासाठी जमीन सर्वेक्षण आणि इतर कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा मागविली आहेत. एप्रिल महिन्यात कांजूरमार्ग डेपोची जमीन राज्य सरकारने एमएमआरडीएला हस्तांतरित केली होती, त्यानंतर आता एमएमआरडीएने प्रकल्प उभारणीसाठी 506 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
कांजुरमार्ग येथे 15 हेक्टर जागेत मेट्रो 6 चा कारशेड उभारण्यात येणार आहे. या जागेचे सर्वेक्षण एमएमआरडीएने सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. या निविदा भरण्याची अखेरची तारीख ६ ऑक्टोबर आहे.

























































