म्हाडामार्फत अक्कलकोट मंदिर परिसराचा विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिह्यातील अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी म्हाडाने सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे.