
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शाओमीने पहिला स्मार्टफोन ‘रेड मी नोट 7’ लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याचा कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. हा स्मार्टफोन या आधीच चीनमध्ये लाँच झाला आहे आणि लककरच ‘रेड मी नोट 7’ जगभरात लाँच होणार आहे.
रेड मी नोट 7, रेड मी नोट 7 प्रो आणि रेड मी गो येत्या तीन महिन्यांत हिंदुस्थानात उपलब्ध होईल. या तीनही फोनची किंमत अनुक्रमे 10 हजार रुपये, 12 हजार रुपये आणि 14 हजार रुपयांच्या आसपास आहे. रेड मी नोट 7 प्रो हे रेड मी नोट 7 चे अद्ययावत व्हर्जन असेल. या स्मार्टफोनमध्येही 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. रेड मी नोट 7 प्रो पुढल्या महिन्यात 2 प्रकारांत लाँच होण्याची शक्यता आहे. फोनची मूळ प्रकारात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे.






























































