
सामना ऑनलाईन । बंगळुरू
बंगळुरूच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज युवराज सिंह पुन्हा एकदा जुन्या रंगामध्ये दिसला. युवीने उपस्थित चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत डोळ्याचे पारणे फेडणारे षटकार लगावले. आपल्या छोट्या पण विस्फोटक खेळीमध्ये युवीने 14 व्या षटकामध्ये सलग तीन षटकार ठोकले आणि बंगळुरुच्या मैदानावर युवी… युवी… युवीचा जयघोष सुरू झाला.
डावाच्या 14 व्या षटकामध्ये युझवेंद्र चहलच्यासमोर सिक्सर किंग युवराज सिंह होता. चहलच्या पहिल्या चेंडूवर युवीने गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा चेंडूही सीमापार टोलवला. 2007 मध्ये युवीने ब्रॉडच्या चेंडूवर सलग सहा षटकार लगावला होता. तोच कारनामा पुन्हा पाहण्याची संधी मिळणार म्हणून प्रेक्षकांची आरडाओरडा सुरू केला. परंतु पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. परंतु सलग तीन षटकार ठोकून युवीने उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले.
This Sixes Has Separate Fan Base
Vintage Yuvi…#YuvrajSingh #RCBvMI #IPL2019 pic.twitter.com/R4FtRrkhP4— Raj Parmar (@gj11ar1562) March 28, 2019






























































