न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरीतांचे संकट, हॉटेल्स झाली हाऊसफुल्ल

न्यूयॉर्क शहरात स्थलांतरित नागरिकांमुळे मनस्ताप वाढला आहे. स्थलांतरितांना राहण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेमुळे न्यूयॉर्कमधील बहुतांश हॉटेल्स फुल्ल झाले आहेत. न्यूयॉर्कच्या महापौरांनीही हात वर केले आहेत. तर सोशल मीडियावर ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांच्यापासून अनेक लोकं जो बायडन सरकारच्या पॉलिसीचा विरोध करत आहेत.

सध्या न्यूयॉर्क स्थलांतरीतांचा सामना करत आहे. जगभरातील प्रवासी न्यूयॉर्क शहरात पोहोचले आहेत. त्याचबरोबर स्थलांतरितांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे ही शहराची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र आता ही संख्या प्रमाणाबाहेर झाल्याने न्यूयॉर्क शहराची स्थिती बिकट झाली आहे. मागच्या महिन्यात 28 डिसेंबर रोजी एलन मस्क टेक्सास सीमेवर गेले होते. ही ती जागा आहे जिथून मोठ्या संख्येने प्रवासी येत होते. बोललं जातं की, अमेरीकेमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या न्यूयॉर्क शहरात आता स्थलांतरीतांना राहण्यासाठी जागा उरलेली नाही. तर अमेरीकेचे राष्ट्रपती जो बायडन सरकारवर टीका केली जात आहे. न्यूयॉर्कमध्ये घरांचे संकट वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूयॉर्कच्या राज्यपाल कॅथी होचूल यांनी स्थलांतरीतांना इशारा देत आता न्यूयॉर्क शहरातील हॉटेल हाऊसफुल्ल झाली असून आता राहायला जागा मिळणार नाही. तर डिसेंबर 2021 मध्ये प्रवाशांचे मोकळ्या हातांनी स्वागत केले होते. स्थलांतरीतांची वाढत्या संख्येंमुळे जे संकट न्यूयॉर्कमध्ये उद्भवले त्यावरुन वाद ओढवला आहे. अॉगस्टमध्ये याबाबत आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलकांनी तर स्थलांतरितांना आश्रयस्थानात जाण्यापासून रोखण्यापर्यंत मजल मारली.