महानंदमध्ये दुधाचा खडखडाट, दैनंदिन वितरणासाठी डेअरीत दूधच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन दिवाळीत महानंदमध्ये दुधाचा खडखडाट असल्याचे समोर आले आहे. सभासद संघांकडून डेअरीला दूधच मिळत नाही. त्यामुळे उद्या गुरुवारसाठी दुधाचे वितरण होणार नसल्याचे डेआरीने स्पष्ट केले आहे.

महानंद डेअरीच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने डेअरीचे संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे डेअरीच्या सभासद संघांनी दूध पुरवठय़ाबाबत हात आखडता घेलता आहे. तसेच खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. मात्र सध्या डेअरीला प्रशासकच नाही. तसेच चार दिवसांपूर्वी ज्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे ते अद्याप हजर झालेले नाहीत. त्यामुळे डेअरीत ठोस निर्णय घेण्यासाठी कोणीच नसल्याने दुधाच्या खरेदी दराबाबत कोणताच निर्णय होत नाही.