MIM च्या प्रवक्त्याला चोपले; कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धुलाई केल्याचा अंदाज

1891
fight
file photo

MIM चे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्त शाहीद शेख यांची कोल्हापुरात जबरदस्त धुलाई करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेच्या आवारातच हा प्रकार घडलेला आहे. शेख हे या हाणामारीत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.शेख यांना कोल्हापूर महानगर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच मारहाण केल्याचे कळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार असे कळाले आहे की शाहीद शेख हा महापालिकेतील अधिकाऱ्यांना सातत्याने उद्धटासारखा बोलायचा आणि तुम्हाला बघून घेईन अशी धमकी द्यायचा. अधिकाऱ्यांना त्याचे वागणे खटकत होते. शुक्रवारी शाहीद शेख हा अतिरिक्त आय़ुक्तांना निवेदन द्यायला महापालिकेत आला होता. निवेदन देऊन खाली उतरत असताना शाहीद शेख आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे आमनेसामने आले. यावेळी शाहीद शेख पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून काहीतरी बोलला. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी भडकले आणि वाद पेटला. या वादातून शाहीद शेखची बेदम धुलाई करण्यात आली असं कळतं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या