
लातूरमध्ये इयत्ता 12 वीच्या परिक्षेसाठी गेलेले अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या आईने या संदर्भात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, त्यांची मुलगी ही इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे. सध्या परीक्षा सुरु असल्याने ती परीक्षा केंद्रावर 7 मार्च रोजी सकाळी आपल्या बहिणीसोबत गेलेली होती. दुपारी 2 वाजता पेपर सुटल्यानंतर ती दिसून आली नाही. तिला घेण्यासाठी आलेली तिची बहिण सर्वत्र शोधाशोध करुन घरी परत गेली. परंतू परीक्षा देऊन मुलगी घरी परत आलीच नाही. गावातील नातेवाईकांकडेही तिचा शोध घेतला पंरतू ती कुठेच सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुनहा दाखल केला आहे.






























































