
मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत असलेले सुभाषचंद्र बोस हे या परिसरातील सर्वात मोठे मैदान म्हणून ओळखले जाते. महानगरपालिकेकडून नित्यनियमाने या मैदानाची देखभाल केली जात आहे. या वर्षी पावसाळ्यातही अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मैदान उत्तम ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेले हे मैदान आता लवकरच सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या स्वागतासाठी हे मैदान सज्ज होत आहे.
महानगरपालिकेकडून पावसाळ्यामध्ये गवत कापणे, झाडांची छाटणी करणे, जॉगिंग ट्रक झाडून स्वच्छ ठेवणे ही कामे करवून घेण्यात आली. त्यामुळे मैदानाची शोभाही वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार मैदान बंद ठेवावे लागत आहे. मात्र लवकरच सर्वांसाठी ठराविक वेळेत मैदान खुले करण्यात येणार आहे.
या प्रभागांतील सर्व नगरसेवक व अधिकारी यांनीही कामाचे काwतुक केले आहे. या मैदानाची देखभाल महानगरपालिकेच्या अटीशर्तीनुसार होत असल्याची पावती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात मैदानावरील लॉन व पिच खराब होऊ नये यासाठी तेवढेच क्षेत्रफळ बंद करण्यात येते. मात्र इतर बाबी खुल्या ठेवल्या जातात.




























































