खाडीत उडी मारलेला जिम ट्रेनर तीन दिवसांनी सापडला, आई वडिलांसह पोलिसांनाही अश्रू अनावर

तीन दिवसांपूर्वी एक जिम ट्रेनर बेपत्ता झाला होता. तो ऐरोलीच्या खाडीमध्ये सापडला आहे. तीन दिवस शोधून हा तरुण सुखरूप सापडल्याने आई वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

धारव नार्वेकर हा 36 वर्षीय तरुण जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. जुलै महिन्यात जिममध्ये धारव आणि एका व्यक्तीची हाणामारी झाली. ही हाणामारी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे धारव दुःखी झाला. तीन दिवसांपूर्वी तो घरातून निघाला पण तो परत आलाच नाही.

धारव घरी न परतल्याने त्याच्या आई वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता धारवची बाईक ऐरोली ब्रिजजवळ सापडली. धारवने या खाडीत उडी मारल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तेव्हा पोलिस, मच्छीमार आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून खाडीत धारवचा शोध घ्यायला सुरूवात केली.

धारवच्या पालकांनी कुठे अनोळखी मृतदेह सापडला आहे का याचीही चौकशी केली. शेवटी 8 तारखेला खारफुटीच्या जंगलातून मला वाचवा मला वाचवा असा आवाज आला. पोलिसांनी बोट जेव्हा या जंगलाकडे वळवली तेव्हा त्यांना धारव सापडला. तीन दिवस अन्न पाण्यावाचून या जंगलात अडकला होता. धाराव तब्येतीते अतिशय क्षीण झाला होता. धारवला जिवंत आणि सुखरुप पाहून आई वडिलांनी आनंद व्यक्त केला. इतकंच काय धारवला पाहून पोलिसांनाही अश्रू अनावर झाले.

तातडीने धारवला या जंगलातून काढून जवळच्या रुग्णायलाय दाखल केले. धारवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.