आमदार अपात्रतेवर आजपासून युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांच्या अपात्रता याचिकेवर उद्यापासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणीत पुढील तीन दिवस युक्तिवाद होतील.

पहिल्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अॅड. देवदत्त कामत आणि त्यानंतर शिंदे गटाकडून अॅड. महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. दोन्ही बाजूकडील वकिलांना साधारण दीड दिवसाचा कालावधी युक्तिवादासाठी दिला जाईल.

हिवाळी अधिवेशना दरम्यान घेतलेल्या सुनावणीत, 12 डिसेंबरला शिंदे गटाच्या पाच आमदारांची उलटतपासणी झाली. दोन्ही बाजूंनी सादर केलेली कागदपत्रे, पुरावे, साक्षी आणि उलटतपासणीच्या आधारावर आता युक्तिवाद होईल.

– 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी संपवून निर्णय राखून ठेवला जाईल.
– पुढील वीस दिवसांत आमदार अपात्रतेचा अंतिम निकाल येण्याची शक्यता.