पूरग्रस्तांना आमदार मनोहर भोईर यांचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उरण

पनवेल तालुक्यातील येथील डोळघर गावातील मुसळधार पावसात 40 ते 50 घरामध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले होते. या घटनेची दखल घेत उरण आमदार मनोहर भोईर यांनी रविवारी या गावाची पाहाणी करुन पूरग्रस्त ग्रामस्थांना भाजी पाला व धान्य वाटप करण्यात आले.

शनिवार पासुन पनवेल तालुक्यात सातत्याने होणार्‍या अतिवृष्टीमुळे डोळघर येथे पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. घराबाहेर साचलेल्या पूराचा पाण्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. यांची माहिती मिळताच आमदार मनोहर भोईर यांनी या डोळघर भेट घेऊन, नुकसानग्रस्त घरांची पाहाणी केली आणि सदर ग्रामस्थांना धान्य पुरवठा देऊन मदतीचा हात दिला.