
सामना ऑनलाईन । मुंबई
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आल्याची घटना घडली. लाड यांनी शीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. बहुमतानंतर मुंबईतील भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शीव येथे विजयाचे सेलिब्रेशन करण्याकरिता स्टेज उभारला होता तेव्हा ‘लाव रे ते फटाके, वाजव रे ढोल’ असे पोस्टर लावले होते. यानंतर मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते. शीव पोलिसांनी मध्यस्थी केली होती. त्या घटनेनंतर आमदार प्रसाद लाड यांना धमक्या येऊ लागल्या होत्या.






























































