
सत्तेत जाण्यासाठी आणि मंत्रिपद मिळविण्यासाठी फक्त अजित पवार यांचेच वय योग्य आहे. त्यांच्यापेक्षा लहान नेते हे बच्चे, तर त्यांच्याहून वयाने मोठे नेते हे ज्येष्ठ ठरतात. केवळ अजित पवार यांचेच वय सर्व गोष्टींसाठी योग्य आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथील सर्वसाधारण सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता रोहित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अकार्यक्षम असावेत आणि अजितदादा हे कार्यक्षम असतील आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे काम असेल म्हणून ते कार्यक्रमाला आले नसावेत अशी टिप्पणी केली.’ सगळीच पदं आपल्याला मिळावीत. त्यासाठी आपले वय नेहमीच योग्य असेल, अशी त्यांची धारणा असावी,’ असे रोहित पवार म्हणाले.




























































