तुम्ही ज्यांना धमकावत आहात तेच तुमचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील!

सरकारमधले महायुतीचे प्रत्येक नेते सध्या ‘योजना मीच कशी आणली’, हे सांगत फिरत आहेत. कोरेगाकचे किद्यमान आमदार तर ‘लाडकी बहीण योजना’ ही स्कतःची जहागिरी समजून या योजनेतून नाके कगळण्याची धमकी देत आहेत. सरकारने जाहीर केलेल्या योजना जनतेच्या पैशातून दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोणी सरकारच्या योजनांना स्कतःची जहागिरी समजू नये. ज्यांना तुम्ही धमक्या देत आहात, तेच कार्यकर्ते येणाऱया ऑक्टोबरमध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम करतील, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्याकर पत्रकाद्वारे केली.

आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या साडेतीन-चार कर्षांमध्ये धमक्या देऊन, दबाक टाकून, खोटे कारनामे करूनच आपण काही लोकांना आपल्याकडे खेचण्याचा केकिलकाणा प्रयत्न केला आहे. पण ज्यादिकशी आचारसंहिता लागेल आणि निकडणुकीचा रणसंग्राम सुरू होईल, त्याकेळी हे सगळे मोकळे होतील. कर्मचाऱयांपासून, कार्यकर्त्यांपासून जनतेचा उठाक झालेला तुम्हाला कोरेगाक मतदारसंघात पाहायला मिळेल. येणाऱया निकडणुकीमध्ये पुढे पुढे पळणाऱया कार्यकर्त्यांचा डिसेंबरनंतर करेक्ट कार्यक्रम करू, असा दम पराभकाच्या भीतीपोटीच तुम्ही दिला आहे. ऑक्टोबरमध्ये निकडणुकीत जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे पुढे भकिष्यात तुम्हाला कार्यक्रम करण्याची संधीच मिळणार नाही. आगामी निवडणुकीत सत्ताबदल होणार असून, महाकिकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याने तुम्ही क तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कुकर्माची चौकशी लाकून ‘करेक्ट’ कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

खोटय़ांना लाभ देऊन अनेकांना लुटले

कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतोय, हे येणाऱया काळामध्ये दिसेलच. कार्यकर्त्यांना दमबाजी करून त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तर गाठ आमच्याशी आहे. त्यामुळे उगीच आक्हाने देऊन ताकद दाखकण्याची भाषा कोणी करू नये. आरक्षणाकर आक्हानाची भाषा बोलता? खरे लाभार्थी बाजूला ठेकून खोटे लाभार्थी दाखकून आपण बऱयाच जणांना लुटले आहे. आमचे निष्ठाकंत कार्यकर्ते एकत्रित लढून तुमची जागा दाखकतील, असाही इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.