
मणिपुरातील इम्फाळमध्ये बुधवारी मुख्यमंत्री ऑफीसजवळ बनवलेल्या पोलीस ठाण्याला जमावाने घेराव घातला. पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर नाराज झालेल्या जमावाने शस्त्रांची मागणी केली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेत गोळीबार केला. दरम्यान, इम्फाळ शहरात संचारबंदी लागू केली आहे. याआधी, दुपारी मणिपूर पोलिसांनी 44 लोकांना ताब्यात घेतले आहे. 32 जण हे म्यानमारमधील आहेत. यांच्यावर एका दिवसापूर्वी टेंग्नौपाल जिह्यातील मोरेह परिसरात पोलीस अधिकाऱ्याची हत्या आणि पोलीस कमांडो पथकावर हल्ला करण्याचा आरोप आहे.



























































