‘केळं’प्रिय माकड खोलीत घुसले, तरुणाच्या पँटची चेन खेचली आणि…

आजूबाजूला माकडे असताना कधीही खोलीची खिडकी उघडी ठेवू नये असं म्हणतात. हे का म्हटलं जातं हे एका तरुणाला व्यवस्थितपणे कळालं आहे. या तरुणासोबत जे घडलं त्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. स्टेनिंग नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर या घटनेबाबत माहिती दिली आहे. त्याच्या एका मित्रासोबत हा प्रकार घडला आहे. स्टेनिंगचे दोन मित्र कंबोडियाला फिरायला गेले होते. ते ज्या खोलीत राहात होते, त्या खोलीच्या खिडक्या त्यांनी उघड्या ठेवल्या होत्या. आणि तिथूनच पुढचा प्रकार घडला. स्टेनिंगचा कंबोडियाला गेलेला एक मित्र दारू प्यायल्याने आणि दमल्याने डाराडूर झोपला होता.

खोलीची खिडकी उघडी असल्याचे पाहून एक माकड या खोलीत शिरले. त्याने झोपलेल्या तरुणाच्या पँटची चेन खाली खेचली आणि माकडाने त्याच्यासोबत तो लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार स्टेनिंगच्या दुसऱ्या मित्राने पाहिला. त्याने याचे फोटो, व्हिडीओही काढले होते. आरडाओरडा केला तर माकड घाबरेल आणि मित्राच्या गुप्तांगाला चावा घेईल अशी भीती वाटल्याने या मित्राने बाहेर जाऊन आरडाओरडा करत माकडाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. या मित्राने झोपलेल्या मित्राला सगळे फोटो आणि व्हिडीओ पाठवले होते. जेव्हा मित्राला जाग आली आणि जेव्हा त्याने मोबाईलवर हे सगळं पाहिलं तेव्हा तो हादरला होता. हा मित्र झोपेतून जागा झाल्यानंतर तिथे एक क्षणही तिथे थांबला नाही. त्याने पहिलं विमान पकडून घरी परतण्याचा निर्णय घेतला.

मानवाप्रमाणेच मकाक, बोनोबोस आणि चिंपांझीं सारख्या माकडाच्या प्रजाती आनंदासाठी लैंगिक मजा करत असतात. लांब शेपटीचे मकाक सेक्स टॉय म्हणून दगडाचाही वापर करतात असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.