मोनो रेल आता जाहिरातीतून कमाई करणार; सिमेंट खांब, स्थानकातील जागा भाडय़ाने देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

घाटय़ात धावत असलेल्या मोनो रेलला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासनाने आता कंबर केली आहे. त्यानुसार मोनो मार्गावरील सर्व खांब, स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार आहे. तसेच स्थानकातील जागा व्यावसायिकांना देण्यात येणार असून त्यासाठी मोनो रेल प्रशासनाने निविदा काढल्या आहेत.

मोनो रेल गेल्या आठ वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत धावत असली तरी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्याने वर्षाला केवळ 14 कोटी रुपये प्रवासी वाहतुकीतून मिळत आहेत, तर वार्षिक खर्च पाचशे कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाने नुकतेच तिकिटाच्या मागील बाजूला जाहिरात छापण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्याच धर्तीवर आता मोनो रेलचे सिमेंटचे खांब, स्थानकांमध्येही जाहिराती लावण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. 19 किलोमीटर लांबीच्या या मोनो रेल मार्गावर 796 खांब असून 17 स्थानके आहे, मात्र आतापर्यंत येथे कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने महसूल वाढवण्यासाठी आपली जागा जाहिरातीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्थानकातील रिकामी जागा खाद्यपदार्थांच्या दुकानांसाठी भाडय़ाने दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार असून मोनो रेलला महसूल मिळणार आहे.