ऑक्टोबरच्या दुसऱ्य़ा आठवडय़ात मान्सून परतणार

मुंबई आणि महाराष्ट्रात मनसोक्त बरसलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या तारखेत यावर्षी 9 दिवसांनी बदल केला. यापूर्वी 29 सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती. परंतु यंदाचा मान्सून हा नेहमीपेक्षा थोडा जास्त काळ राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

राजस्थान आणि आसपासच्या परिसरातून मान्सूनचा परतीचा प्रवास 28 सप्टेंबरपासून सुरू होईल. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास मुंबईपासून सुरू होईल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत तो ऊर्वरित महाराष्ट्रातून परत जाईल असे केंद्रीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितले. हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के. एस. होशाळीकर यांच्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होत राहील. 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत त्याचा जोर कमी होत जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या