श्रीरामपूर पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोराकडून 12 मोटारसायकली जप्त

श्रीरामपूर पोलिसांनी सराईत मोटरसायकल गुन्हेगाराला पकडले असून त्याच्या कडून 12 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. दत्तू सावळेराम पवार (वय 29 वर्षे, रा. रांजणगाव, ता. राहता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तालुका पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या दत्तु पवार याने वाकडी, चितळी, राहता, शिर्डी या भागात मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या माहितीवरुन पोलिसांनी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याच्यावर चोरी व घरफोडीचे सहा गुन्हे दाखल आहेत.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोरसे, सहाय्यक फौजदार आढागळे , गोरे ,हवालदार शेख, हवालदार हबीब ,नाईक शेंगाळे, गोरे,लोंढे, गुंड, पठाण व शिपाई पठाण, रणवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या